Menu Close

छत्तीसगडमध्ये धर्मांधांना मंदिराच्या आवारात दारू पिण्यास रोखल्याने त्यांचे मंदिरावर आक्रमण

  • हिंदुबहुल भारतातच हिंदूंची मंदिरे असुरक्षित !
  • अशा घटना प्रसारमाध्यमे कधीही प्रसारीत करत नाहीत; कारण अशा घटना दाखवणे म्हणजे हिंदुत्वाला प्रोत्साहन देण्यासारखे आहे आणि ते पुरोगामित्वाच्या विरोधात आहे !
  • अशी घटना चर्च किंवा मशीद यांच्या संदर्भात घडली असती, तर एकजात सर्व प्रसारमाध्यमांनी हिंदूंना असहिष्णु, भगवे आतंकवादी ठरवले असते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

रायपूर (छत्तीसगड) : राज्याच्या रायगड जिल्ह्यातील खेरपूर क्षेत्रात धर्मांधांच्या एका टोळीने मंदिरावर आक्रमण करून मंदिराची तोडफोड केली. मंदिराच्या आवारात दारू पिण्यास मज्जाव केल्याने चिडलेल्या धर्मांधांनी मंदिरावरच आक्रमण केले, असे वृत्त दैनिक भास्करने प्रसिद्ध केले आहे. मंदिराचे पुजारी आणि त्या परिसरातील काही हिंदूंनी धर्मांधांना मंदिरासारख्या धार्मिक स्थळाच्या आवारात दारू न पिण्याविषयी सांगितले. त्यावरून चिडलेल्या त्या धर्मांध तरुणांनी त्यांच्या आणखी मित्रांना बोलावले आणि सुमारे २० जणांच्या टोळीने मंदिरावर आक्रमण केले. पुजार्‍याला मारहाण केली. तसेच मंदिराची तोडफोड केली. पोलिसांना पाचारण केल्याचे लक्षात येताच त्यांनी पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *