सध्या व्हॉट्स अॅप वर पुढील संदेश मोठ्या प्रमाणात फिरत आहे. त्यातून साधू-संतांची अपकीर्ती आणि हिंदूंची दिशाभूल केली जात आहे.
‘आजपासून एक शपथ घ्या, कुठल्याही पृथ्वीवरच्या जिवंत महाराजाला देणगी देऊ नका किंवा त्याच्या दर्शनाला जाऊ नका. देणगी द्यायची असल्यास आपल्या कर्जबाजारी शेतकर्यांच्या कुटुंबियांना द्या. कुठल्याही मंदिरात किलोभर सोने अर्पण करू नका. त्याऐवजी एका गरीब कुटुंबाला जगवा त्यांच्या मुलांना शिक्षण द्या. देव माणूस आणि माणुसकीत आहे.’
हिंदूंची दिशाभूल करणार्या संदेशाचे खंडण
१. खरे आणि भोंदू संत ओळखण्यासाठी आपली साधना असावी लागते.
२. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख मंदिरे शासनाच्या कह्यात आहेत. याचा अर्थ असा की, तुम्ही देवाला दिलेले अर्पण शासनाच्या तिजोरीत जात असल्याने हा सल्ला शासनाला द्या.
३. ‘मुसलमानांनी शासनाच्या पैशातून हज यात्रेला जाण्याऐवजी तो पैसा शेतकर्यांना द्यावा’, असा संदेश मुसलमानांना दिलेला कुठेही पाहिले नाही. केवळ हिंदूंची दिशाभूल करण्यासाठी असे संदेश हिंदूंना दिले जात आहेत.
– श्री. हिरालाल तिवारी, हिंदु जनजागृती समिती, सोलापूर.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात