बांगलादेशमध्ये असुरक्षित हिंदु मंदिरे !
ढाका (बांगलादेश) : माणिकगंज जिल्ह्यातील सिंगेर उपजिल्ह्यामधील सोलाई बांगला गावामध्ये ४ सप्टेंबरच्या रात्री काही धर्मांधांनी मंदिरांवर आक्रमण करून हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली. धर्मांधांनी येथील श्री रक्षा काली मंदिर आणि श्री लोखनात मंदिर यांवर आक्रमण केले. मंदिरांची कुलुपे तोडून आत प्रवेश केला. आतील १० मूर्तींची तोडफोड करून त्यांची विटंबना केली. मंदिराचे पुजारी लालचंद राजबंगशी यांनी महंमद जलील, तुली खतुन, महंमद फरूक, महंमद सहार अली, महंमद बहर अली यांच्या विरोधात सिंगेर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या भागात हिंदु नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांनी सिंगेर पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांशी संपर्क साधून हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड करणार्यांना अटक करण्याची मागणी केली. ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे एक पथक या मंदिरांना भेट देऊन हानीविषयी आढावा घेणार असल्याचे अधिवक्ता रवींद्र घोष यांनी सांगितले.
बांगलादेश मध्ये हिंदु तसेच हिंदुंची श्रध्दास्थाने यांवर सतत धर्मांधांकडून आक्रमण होत आहे याविषयी भारतातील तथाकथित मानवतावादी काहीच बोलत नाही. परंतु हिंदुनो आज जे बांगलादेश मध्ये घडत आहे ते भारतात घडण्यास वेळ लागणार नाही किंबहुना भारतात ते काही प्रमाणात घडतही आहे. बांगलादेशी घुसखोरी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. हेच बांगलादेशी आज जे तिकडे करत आहेत ते उद्या इथे करणार नाहीत याची काय शाश्वती ?
तुम्ही काय करु शकता ?
१. बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरावरील हल्ल्याचा मुद्दा तेथिल सरकारसमोर मांडण्यासाठी आणि हिंदूंचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी आपण प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करू शकता.
२. आपण ट्विटर आणि ईमेलद्वारेही वरील मागणी करू शकता. आपण #BangladeshTempleAttacked सारख्या हॅशटॅग्जसह आपल्या ट्विट पोस्ट करू शकता आणि आम्हाला @hindujagrutiorg ला देखील टॅग करू शकता.
३. भारत सरकार रोहिंग्या मुसलमानांना भारताबाहेर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. आता आपण भारतात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर पाठवण्याची मागणी करु शकता.
४. अनेक राज्यांमध्ये स्थानिक शासनाने तिरुपती मंदिर, गुरुवायूर मंदिर, सिध्दीविनायक मंदिर, शिर्डी साईबाबा मंदिर इ. हिंदू मंदिरे ताब्यात घेतली आहेत. या मंदिरातील भ्रष्टाचार आणि मंदिरातील संपत्तीचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणात उघडकीस आला आहे, त्यामुळे आपण केंद्र सरकारकडे हिंदू मंदिरांना मुक्त करण्याची मागणी करा.
0 Comments