हिंदूंकडून विरोध
मेलबर्न : ऑस्ट्रेलियातील ‘मीट अॅण्ड लिव्हस्टॉक ऑस्ट्रेलिया’ या आस्थापनाने तिच्या मटणाच्या विज्ञापनामध्ये गणपतीला कोकराचे मांस खातांना दाखवल्याचा प्रकार घडला आहे. या विज्ञापनाचा हिंदूंकडून विरोध करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या आस्थापनाने संकेतस्थळावर ‘आपण ऑस्ट्रेलियाच्या सरकारचे सहयोगी आहोत’, असा दावा केला आहे. याचा वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या भारतीय समाजाचे प्रवक्ते नितिन वशिष्ठ यांनी कडक शब्दात विरोध केला आहे. (विज्ञापनांमध्ये हिंदूंच्या देवतांचा संबंध मटणाशी दाखवण्याची कृती निषेधार्ह आहे – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात