Menu Close

संघाच्या नेत्याच्या हत्येच्या प्रकरणात आरोपी असलेले माकपचे नेते न्यायालयाला आले शरण !

या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन हिंदुद्वेष्ट्यांना कठोर शिक्षा होणे, हिंदूंना अपेक्षित आहे !

थालासेरी (केरळ) : चिकित्सालयात भरती असलेले माकपचे थालासेरी येथील माकप जिल्हा सचिव पी. जयराजन १२ फेब्रुवारी या दिवशी जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर शरण आले. न्यायालयाने त्यांना ११ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जयराजन यांच्या अधिवक्त्याने जयराजन यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत त्यांना चिकित्सालयातच राहू देण्याची मागणी केली होती, ज्यास न्यायालयाने नकार दिला. कारागृह अधीक्षकाने सांगितलेल्या चिकित्सालयातच ते भरती होऊ शकतात, असा आदेश या वेळी न्यायालयाने दिला.

१. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कन्नूर जिल्ह्याचे नेते इ. मनोज यांची २ सप्टेंबर २०१४ या दिवशी हत्या करण्यात आली होती.

२. या हत्येच्या आरोपाखाली केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) जयराजन यांच्या अटकेची मागणी करत आहे.

३. जयराजन यांनी केरळ उच्च न्यायालयात केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाला ११ फेब्रुवारीला न्यायालयाने फेटाळले. त्यामुळे दुसर्‍या दिवशी चिकित्सालयात भरती असलेले जयराजन यांनी स्वत:हून डिसचार्ज घेतला आणि जिल्हा आणि सत्र न्यायालयास शरण आले.

४. हत्येसंदर्भात जयराजन यांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग न्यायालयाकडे मागणी करणार आहे.

जयराजन यांचा थयथयाट !

माकपच्या नेत्यांना खोट्या आरोपांखाली अडकवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. मुख्यमंत्री ओमेन चांडी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या षड्यंत्राचे समर्थन करत आहेत. माकपला आतंकवादी संघटना घोषित करण्याचा राजकीय शत्रूंचा हा डाव आहे, असा थयथयाट पी. जयराजन यांनी न्यायालयाबाहेर पत्रकारांसमोर केला. (बंगाल आणि केरळ या राज्यांमध्ये अनेक वर्षे माकप आणि अन्य साम्यवादी पक्ष सत्तेवर राहिले. या काळात त्यांनी हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले अथवा धर्मांधांकडून होऊ दिले. गेल्या काही वर्षात केरळात हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्या ही त्याची साक्ष देतात. त्यामुळे जयराजनसारख्या हिंदुद्रोही नेत्यांना जनता ओळखून आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *