ढाका : बांगलादेशची राजधानी ढाका येथील शासकीय सूत्रांनुसार, रोहिंग्या आतंकवाद्यांची घुसखोरी रोखण्याच्या उद्देशाने बांगलादेशच्या सीमेवर म्यानमारच्या बाजूने सुरुंग पेरायचे काम चालू आहे. बांगलादेशच्या सीमेवर तैनात अधिकारी मंजुरुल हसन खान यांनी सांगितले की, म्यानमार प्रांताकडून स्फोटाचा आवाज ऐकू आल्यामुळे लक्षात आले की, म्यानमार सुरक्षादलाने सीमेवर सुरुंग पेरून ठेवले आहेत. ही सीमा पार करतांना एका मुलाने त्याचा पाय गमावला आहे, तसेच दुसरा मुलगा घायाळ झाला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात