पाकच्या कलाकारांना भारतात पायघड्या घालणारे पाकचा भारतद्वेष जाणतील तो सुदिन ! – सम्पादक, दैनिक सनातन प्रभात
कराची (पाकिस्तान) – येथील विमानतळावर वर्ष १९८६ मध्ये पॅन-अॅम विमानाचे अपहरण करण्यात आले होते. त्यामधील वास्तव प्रसंगांवर आधारित नीरजा या भारतीय चित्रपटावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. अभिनेत्री सोनम कपूर यांची भूमिका असलेल्या या चित्रपटात पाकिस्तानविषयी विपर्यस्त चित्रण असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले आहे. (धूर्त पाकिस्तानकडून भारत काही शिकेल का ? – संपादक)
१. पाकिस्तानातील प्रमाणपत्र मंडळाकडे चित्रपट सादर करण्यापूर्वीच चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२. पॅन-अॅमच्या विमानातील कर्मचारी नीरजा भानोत यांनी प्रवाशांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला असता आतंकवाद्यांनी त्यांना गोळ्या घालून ठार केले होते. त्यावर या चित्रपटाचे कथानक बसवलेले आहे.
स्त्राेत : दैनिक सनातन प्रभात