Menu Close

बाजीराव-मस्तानी चित्रपट म्हणजे निवळ हिडीसपणा ! – पानीपतकार विश्‍वास पाटील

दिग्दर्शक भन्साळी यांनी कधी अन्य पंथियांच्या संदर्भात अशी विकृत दृश्ये दाखवण्याचे आणि अभिनेता रणवीर सिंह यांनी त्यात काम करण्याचे धाडस दाखवले असते का ? 

हिंदूंनी या चित्रपटावर बहिष्कार घालून हिंदुऐक्य दाखवायला हवे !

 मुंबई : वादग्रस्त बाजीराव-मस्तानी हा चित्रपट म्हणजे निवळ हिडीसपणा आहे, अशा शब्दांत बाजीराव पेशवे यांचा जीवनपट मांडणारे पानीपतकार तथा प्रसिद्ध इतिहास संशोधक विश्‍वास पाटील यांनी या चित्रपटावर टीका केली.
 विश्‍वास पाटील पुढे म्हणाले, चित्रपट स्वातंत्र्याच्या नावाखाली मारुतीचा गणपती आणि गणपतीचा मारुति कसा करता येईल ? बाजीराव पेशवे हे समाजाचे नायक आहेत. निवळ योगायोग दाखवायचा होता, तर मग भन्साळी यांनी त्यांचा स्वतःचा ब्रॅण्ड वापरायचा होता. बाजीराव पेशव्यांच्या नावाचा उपयोग का केला? राजघराण्यातील स्त्रियांना अल्प वस्त्रांत दाखवून दिग्दर्शकाने मोठी चूक केली आहे. त्या काळातील स्त्रिया पडद्या आडच रहात असत. असे असतांना त्या स्वतः कशा काय नाचू शकतील ? लावणी ही नंतर अस्तित्वात आली. मग लावणीची चाल पिंगा या गाण्याला कशी काय वापरली गेली ? एकूणच हा सर्व प्रकार निंदनीय आहे.
बाजीराव-मस्तानी हा चित्रपट १८ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. सर्वप्रथम सिनेमाचा ट्रेलर (चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यातील मुख्य दृश्ये विज्ञापनाच्या स्वरूपात दाखवणे) निघाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता निर्माण झाली होती; मात्र पिंगा, मल्हारी ही गाणी पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी हा चित्रपट पहाण्यापूर्वीच तो नाकारून त्यास जोरदार विरोध दर्शवला. पिंगा या गाण्यात राजघराण्यातील २ स्त्रियांना अल्प वस्त्रे घालून नाचतांना दाखवण्यात आले आहे, तर मल्हारीया गाण्यात स्वत: बाजीराव पेशवाच त्यांच्या सैन्यासमवेत ताल धरतांना दाखवण्यात आले आहे. अशा एक ना अनेक गोष्टींमुळे हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादग्रस्त ठरला.

चित्रपटाद्वारे लोकांमध्ये चुकीचा संदेश ! – उदयसिंह पेशवा

 पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवा म्हणाले, राजघराण्यातील २ स्त्रिया अशाप्रकारे अल्प वस्त्रे परिधान करून नाच करणे कदापि शक्य नाही. मराठी स्त्रिया ३०० वर्षांपूर्वी असे नाचत असतील, हे दाखवून लोकांना चुकीचा संदेश दिला गेला आहे.

इतिहास अशा पद्धतीने पडद्यावर मांडणे, हे संतापजनक ! – इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे

इतिहासाचे अभ्यासक श्री. मंदार लवाटे म्हणाले, हे सर्व उद्वीग्न करणारे आहे. या प्रकाराला दुर्दैवी याशिवाय दुसरा शब्द नाही. दिग्दर्शकाने चित्रपट स्वातंत्र्याच्या नावाखाली अतिशय चुकीचे चित्रण केले आहे. इतिहास अशापद्धतीने पडद्यावर मांडणे, हे संतापजनक आहे. मलहारी या गाण्यात बाजीराव पेशवे यांच्या भूमिकेतील अभिनेता रणवीर सिंह सैन्याच्या अंगावर चढतांना दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात पेशवे कधीही त्यांच्या सैन्याला पाय लागू देत नसत. ते सैन्याची विशेष काळजी घेत असत.

अभिनेते रणवीर सिंह यांच्याकडून प्रेक्षकांची फसवणूक !

चित्रपटावरून वाद निर्माण झाल्यानंतर या चित्रपटाचे अभिनेता रणवीर सिंह म्हणाले होते की, आम्ही चित्रपटाच्या आरंभी डिस्क्लेमर (एकप्रकारची कायदेशीर सूचना) लिहिणार आहोत. यामध्ये या चित्रपटातील सर्व व्यक्तीरेखा आणि घटना संपूर्णतः काल्पनिक असून यांचा कुठल्याही व्यक्ती अथवा घटनेशी कुठलाच संबंध नाही. कोणतेही साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. तथापि प्रत्यक्षात जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर निघाला तेव्हा त्यात The Love Story of Warrior Bajirao Mastani, (बाजीराव आणि मस्तानी यांच्यातील प्रेमकथा) असा उल्लेेख करण्यात आला होता.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *