आराकान (म्यानमार) : नारीनजारा डॉट कॉम ने सादर केलेल्या अहवालानुसार, आराकानच्या मोंगडॉ गावात रोहिंग्या मुसलमान आतंकवाद्यांनी १०० हून अधिक हिंदूंची हत्या केली आहे. या हत्यांमुळे सहस्रो हिंदूंना पलायन करून बांगलादेशमधील शरणार्थी शिबिरामध्ये रहावे लागत आहे. रोहिंग्या आतंकवाद्यांनी काही हिंदु महिलांंचे अपहरण केले आणि त्यांना बलपूर्वक इस्लाम धर्म स्वीकारणे भाग पाडले आहे. अनेक हिंदु कुटुंबांनी पश्चिम म्यानमार प्रांताची राजधानी असलेल्या सिट्टवे येथील एका मंदिरात आश्रय घेतला आहे.
१. रोहिंग्या आतंकवाद्यांनी ९८ हिंदूंची हत्या केल्याची पुष्टी बथहदाँगच्या सरकारी शाळेतील एक हिंदु शिक्षक यू मोंग मोंग यांनी दिली आहे. ‘खा मोंग सीत गावातील हिंदु कुटुंबांनी म्यानमारच्या पोलिसांना माहिती पुरवली म्हणून आतंकवाद्यांनी हिंदूंना धमकावले आणि नंतर त्यांनी ही क्रूर कृती केली, असे यू मोंग मोंग यांनी सांगितले.
२. बांगलादेशच्या दैनिक ‘द डेली स्टार’ने १ सप्टेंबरला प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, सुमारे ४०० हिंदूंनी राखीन राज्यातून बांगलादेशमध्ये शरण घेतले आणि ते कुटुपोलॉन्गमधील अस्थायी शिबिरांमध्ये विस्थापित मुसलमानांबरोबर रहात आहेत.
३. ‘द डेली स्टार’ने म्हटले आहे की, निर्वासित हिंदूंच्या अंदाजाने राखीन राज्यातील ८० पेक्षा अधिक हिंदूंना अज्ञात शस्त्रधारी जिहाद्यांनी ठार केले.
मागील काही दिवसात भारतात उत्तराखंड ते केरळ आणि मुंबई ते बंगालपर्यंतच्या मुसलमान संघटना आणि तथाकथित सेक्युलर कार्यकर्ते रोहिंग्या मुसलमानांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी रोहिंग्या मुसलमानांना भारतात शरण देण्याची मागणी केली होती. या संघटना तसेच सेक्युलर कार्यकर्ते रोहिंग्या आतंकवाद्यांचे पण समर्थन करत आहेत का ? दिवसेंदिवस पाकिस्तान तसेच बांगलादेश मध्ये जिहाद्यांकडून हिंदुंची मोठ्या प्रमाणात हत्या केली जात आहे. मंदिरांवर आक्रमण करुन मूर्तींची तोडफोड केली जात आहे, या विषयी या सर्व संघटना आणि सेक्युलर कार्यकर्ते गप्प का ?
हिंदुंनो, म्यानमार मध्ये हिंदुंवर होणाऱ्या अत्याचारांशी मला काही संबंध नाही अशी मानसिकता ठेऊ नका. भारतात अवैध पध्दतीने रहाणारे कराेडो बांगलादेशी भारतासाठी सुरक्षेच्या दृष्टीने मोठी समस्या आहे. त्यासोबत आता जिहादी मानसिकता असणारे रोहिंग्या भारतात रहायला लागले तर त्याचे काय परिणाम होतील याची आपण कल्पना करू शकता.
दुसरीकडे भारतात बऱ्याच हिंदु संघटना कार्यरत आहेत परंतु त्यातील काेणीही म्यानमार मधील हिंदुंच्या रक्षणासाठी कोणती मागणी अथवा कृती केलेली नाही. म्यानमार मध्ये राहणाऱ्या हिंदुंसाठी आपल्या मनात थोडीही जागा नाही का ? आज काळाची गरज आहे की सर्व हिंदु संघटनांनी संघठित होऊन म्यानमार मधील हिंदुंच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करायला हवे.
एक हिंदु या नात्याने म्यानमार मधील हिंदुंसाठी तुम्ही काय करु शकता ?
१. म्यानमार मधील हिंदुंच्या सुरक्षेसाठी भारत सरकारला हा मुद्दा तेथील सरकारसमोर मांडण्यासाठी आणि हिंदूंचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी अन्य हिंदुंना सोबत घेऊन आपण प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करू शकता.
२. आपण ट्विटर आणि ईमेलद्वारेही वरील मागणी करू शकता. यासाठी आपण#DeportRohingyas, #BanRohingyasInIndia सारख्या हॅशटॅग्ज चा वापर करुन आपल्या ट्विट पोस्ट करू शकता.