बलिया (उत्तरप्रदेश) : उत्तरप्रदेशच्या सिकंदरपूर येथील नगमा परवीन (वय २४ वर्षे) या महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे चित्र काढल्याने संतप्त झालेला तिचा पती परवेज खान याने आणि सासरच्या लोकांनी तिला मारहाण केली अन् घरातून बाहेर काढले. ती वडिलांच्या घरी निघून गेली. परवेज खान दुसरे लग्न करत असल्याची माहिती मिळाल्यावर नगमा हिने त्याच्या घरी जाऊन त्याला विरोध केल्यावर तिला पुन्हा मारहाण करण्यात आले. तिला वेडी ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे नगमाने पोलिसांत तक्रार केली आहे.
काही वर्षांपुर्वी चित्रकार एम्. एफ्. हुसैन ने हिंदु देवी-देवतांची नग्न चित्रे काढली होती याचा हिंदुंनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. त्यावेळी तथाकथित मानवधिकार कार्यकर्ते आणि सेक्युलर मीडिया यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हनन असा प्रचार करून हिंदुंचा विरोध केला होता तर एम्. एफ्. हुसैन चे समर्थन केले होते. आज तेच कार्यकर्ते आणि सेक्युलर मीडिया नगमा परवीन सोबत झालेल्या घटनेवर गप्प आहेत. हे नगमा परवीन च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे नाही का ?