परभणी : म्यानमारमध्ये मुसलमानांवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात भारत सरकारने ठोस निर्णय घेऊन त्यांना साहाय्य करावे, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डात सरकारने कोणतेही हस्तक्षेप करू नयेत, मुसलमान समाजाला ठरवल्याप्रमाणे आरक्षण द्यावे यांसारख्या अन्य मागण्यांसाठी येथील मुसलमान समाजाच्या वतीने मूक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. नंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. या वेळी सहस्रो मुसलमान उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात