अल्पसंख्य असूनही गुन्हेगारीत बहुसंख्य असलेले धर्मांध !
खन्ना (पंजाब) : गोव्यातील ४ धर्मांध युवकांनी मोगा येथील एका महिलेचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला; मात्र पंजाबमधील खन्ना येथील पोलिसांनी हा डाव उधळून लावतांना या चारही युवकांना कह्यात घेतले आहे. इस्माईल शेख (२८ वर्षे), फिरहान शेख (२५ वर्षे), मुहंमद हनीफ आणि शेख महंमद ही या मुसलमान युवकांची नावे आहेत. पोलिसांनी या प्रकरणी या आरोपींच्या सोबत असलेल्या एका महिलेलाही कह्यात घेतले आहे, तसेच आरोपींकडून 2 खेळण्यातील पिस्तुलेही जप्त केली आहेत.
खन्ना येथील वरिष्ठ पोलीस अधीक्षक नवज्योत सिंग महल यांनी दिलेल्या माहितीनुसार हे चारही जण आणि एक महिला विमानाने देहली आणि अमृतसर येथे आले होते. ते भाड्याच्या स्कॉरपियो गाडीतून अमृतसर येथून देहलीला जात असतांना वाटेत पोलिसांनी त्यांना कह्यात घेतले. या युवकांनी मोगा येथील एका युवतीचे अपहरण केले होते. अपहरण करण्यात आलेली युवती मूळची फिरोझपूर येथील असून ती सध्या मोगा येथे वास्तव्यास होती. अपहरण करण्यात आलेल्या युवतीने यापूर्वी एकदा गोव्याला भेट दिली होती. संशयित आरोपी इस्माईल शेख याने त्या वेळी या युवतीशी परिचय करून घेतला होता. युवतीचे अपहरण झाल्यानंतर युवतीच्या पालकांनी त्वरित पोलिसांकडे तक्रार केल्यावर पोलिसांनी शिताफीने संशयितांना कह्यात घेतले. संशयितांच्या विरोधात मोगा पोलीस अपहरणाचा गुन्हा नोंदवणार आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात