टीका : हिंदु धर्माने लोकांना दैवाधीन आणि आळशी केले. – पुरोगामी
खंडण
१. हिंदु धर्माने लोकांना दैवाधीन, म्हणजे प्रारब्धाधीन केले नाही, तर ‘जीवनात काही गोष्टी प्रारब्धाधीन असतात’, हे सत्य शिकवले. तसेच ‘साधना केल्यास प्रारब्ध सुसह्य होते आणि प्रारब्ध भोगून संपवावे लागते’, हेही शिकवले. मागच्या जन्मी काहीतरी केले, म्हणून या जन्मी हे भोगावे लागले, हे कळल्याने मनुष्य या जन्मी सदाचरणी होतो, तसेच कर्म-फलन्याय लागू व्हायचा नसेल, तर निष्काम कर्म करायचे असते, हेही हिंदु धर्मानेच शिकवले. कुठे भोगवादी पाश्चात्त्य संस्कृतीचा उदो उदो करणारे पुरोगामी, तर कुठे ‘दिसेल ते कर्तव्य आणि भोगीन ते प्रारब्ध’, असे शिकवणारे सनातनी.
२. जो धर्म सनातन आहे, म्हणजे जो शाश्वताची प्राप्ती करून देतो, जो नित्यनूतन आहे आणि जो धर्म ईश्वराचे ज्ञान देतो, तो धर्म मनुष्याला आळशी कसा बनवेल ? तसेच जो हिंदु धर्म कनिष्ठ अशा रज-तम गुणांचा नाश करणारा आहे आणि जो मनुष्याला साधक बनवतो, तो हिंदु धर्म आळशी कसा बनवेल ?