कोल्हापूर : मौजे मोरेवाडी (तालुका करवीर) येथील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची करवीरनिवासिनीच्या नावे असणारी ८ एकर भूमी परस्पर विक्री केली होती; मात्र उपविभागीय अधिकार्यांकडे केलेले अपील मान्य होऊन या भूमीला पुन्हा श्री करवीरनिवासिनी देवीचे नाव लावण्यात आले आहे, अशी माहिती प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी १२ सप्टेंबरला पत्रकार परिषदेत दिली. (देवस्थान समितीची भूमी परस्पर विक्री करणार्यांवर कारवाई होणेही अपेक्षित आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
दिलीप देसाई पुढे म्हणाले की,
१. प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेने ‘देवस्थान समितीमधील या अपकारभाराची एस्आयटीद्वारे चौकशी व्हावी’, अशी मागणी केली होती. गेल्या १८ मासांत कारवाई झाली नाही. शासनाकडून कारवाई होत नसल्याने अखेर उपविभागीय अधिकार्यांकडे अपील केले.
२. मौजे मोरेवाडी येथील करवीरनिवासिनी देवीच्या नावे असलेल्या भूमीचा इनाम वर्ग-३ रहित करून भर आकारी करण्यासाठी महसूलमंत्र्यांकडे आवेदन केले होते. तत्कालीन मंत्री सुरेश धस यांनी आवेदन मान्य करून देवस्थानचा इनाम वर्ग अल्प केला.
३. भाजप सरकार सत्तेत आल्यावर सुरेश धस यांनी केलेले सर्व आदेश रहित केले. त्यानंतर तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा आदेश काढून देवस्थानचा इनाम वर्ग अल्प केला आणि भूमी भर आकारी करून दिली.
४. देवस्थान इनामाच्या भूमीची विक्री अथवा कब्जेगहाण देता येत नाहीत; मात्र देवस्थानची ५० कोटी रुपयांच्या इनामी भूमीचा देवस्थानकडून केवळ ४ कोटी रुपयांना खरेदी व्यवहार झाला. यानंतर महसूल यंत्रणेतील अधिकार्यांच्या संगनमताने या भूमीची पुन्हा विक्री केली; मात्र ही भूमी पुन्हा देवीच्या नावे करण्यात यश आले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात