-
आतंकवाद्यांवरील कारवाईमुळे पलायन केलेल्या रोहिंग्यांचा आरोप
-
निधर्मीवादी प्रसारमाध्यमांकडून रोहिंग्यांवरील तथाकथित अत्याचार प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न !
काश्मीरमध्ये मशिदींतून हिंदूंना धमकी देण्यात आली होती की, हिंदु काफिरांनो, तुमची संपत्ती आणि बायका येथेच ठेवून निघून जा ! या धमकीनंतर जे गेले नाहीत, त्यांना ठार करण्यात आले आणि महिलांवर बलात्कार करण्यात आले ! या दहशतीमुळे छावण्यांमध्ये रहाणार्या काश्मिरी पंडित महिलांच्या मासिक पाळ्याही बंद झाल्या होत्या, फाळणीच्या वेळी लक्षावधी हिंदु महिलांवर बलात्कार झाले, त्यांचे स्तन कापण्यात आले, हा इतिहास भारतातील प्रसारमाध्यमे कधीही प्रकाशित करत नाहीत; मात्र आतंकवादी रोहिंग्यांवरील कथित अत्याचाराच्या ‘कथा’ प्रसिद्ध केल्या जातात, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कॉक्स बाजार (बांगलादेश) : म्यानमारमध्ये रोहिंग्या आतंकवाद्यांच्या विरोधात तेथील सैनिकांनी मोहीम हाती घेतली आहे. यात अनेक आतंकवाद्यांना ठार करण्यात आले असून त्यांची घरे नष्ट करण्यात येत आहेत. यामुळे सहस्रो रोहिंग्यांनी पलायन करून बांगलादेशमधील शरणार्थी छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. यातील काही महिलांनी आरोप केला की, म्यानमारचे सैनिक घरात घुसून सुंदर मुलींना शोधतात आणि त्यांचे अपहरण करून त्यांच्यावर अत्याचार करतात; मात्र त्यांच्या या आरोपात अद्याप कोणतेही तथ्य समोर आलेले नाही.
तरीही या प्रकारची वृत्ते तथाकथित निधर्मीवादी प्रसारमाध्यमांकडून प्रसारित केली जात आहेत. संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार बांगलादेशातील छावण्यांमध्ये ४ लाख रोहिंग्या रहात आहेत.
१. भारतातील एका प्रसिद्ध इंग्रजी दैनिकाच्या प्रतिनिधीने बांगलादेशातील कॉक्स बाजारच्या कुतुपलंग येथील छावण्यांत जाऊन काही रोहिंग्यांकडून माहिती घेतली. यात या महिलांनी वरील आरोप केले. बलात्कारानंतर या तरुणींना ठारही करण्यात आले, असेही या महिलांनी सांगितले.
२. बेगम बहार या रोहिंग्या महिलेने सांगितले की, जेथे आम्ही जन्म घेतो, ती आमच्यासाठी मातृभूमी होते. (भारतातील मुसलमान कधी असे का म्हणत नाहीत ? आणि ‘वन्दे मातरम्’ का गात नाहीत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) मग तुमच्याशी तेथे कसे वागले जाते याला महत्त्व रहात नाही; कारण कोणीही स्वत:च्या आईचा त्याग करत नाही; मात्र आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. सैन्य आमच्या गावात घुसले आणि त्यांनी आम्हाला मारायला प्रारंभ केला. (म्यानमारचे सैन्य रोहिंग्यांचा आतंकवाद मुळासकट नष्ट करत आहे, तसा काश्मीरमधील आतंकवाद भारत कधी नष्ट करणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
भारत बांगलादेशातील शिबिरांमध्ये रहाणार्या रोहिंग्यांना साहाय्यता सामग्री पाठवणार
भारताची नेहमीची गांधीगिरी ! रोहिंग्यांना साहाय्य करणार्या भारताने काश्मीरमधील साडेचार लाख पंडितांना हवे तसे साहाय्य कधी केलेच नाही, ही वस्तूस्थिती आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
ढाका : म्यानमारमधून पलायन करून बांगलादेशातील शरणार्थी शिबिरांमध्ये रहात असलेल्या रोहिंग्या मुसलमानांसाठी भारत साहाय्य साहित्य पाठवणार आहे. भारतीय विमान हे साहित्य घेऊन बांगलादेशच्या चटगाव येथे जाणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात