एका शहरातील पोलिसांची मोगलाई ! अन्य धर्मियांच्या कार्यक्रमाविषयी अशी भूमिका पोलीस कधी घेतात का ?
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच एका शहरात हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेनंतर धर्म आणि राष्ट्र यांसाठी कार्य करू इच्छीणार्यांना दिशा मिळावी, यासाठी एका मंदिरामध्ये धर्माभिमानी हिंदूंची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या वेळी शहर पोलिसांच्या मोगलाईचा प्रत्यय आला. बैठक चालू असतांना शहरातील एका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या साध्या वेशातील दोन पोलिसांनी मंदिराच्या प्रमुखांना दमदाटी करून समितीच्या कार्यासाठी मंदिर उपलब्ध करून न देण्याविषयी खडसवले. एवढेच नाही, तर आढावा बैठकीची छायाचित्रे काढून बैठकीची सर्व सूत्रेही लिहून घेतली.
पोलीस अधिकारी मंदिराच्या प्रमुखांना म्हणाले, हिंदु धर्मजागृती सभेनंतर हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. (असे कुठलेही गुन्हे दाखल झालेले नाहीत, असे हिंदु जनजागृती समितीने कळवले आहे. यावरून पोलीस खोटे बोलून समाजात समितीविषयी अपसमज आणि भीती पसरवत आहेत, असे वाटल्यास त्यात चूक ते काय ? – संपादक, हिन्दूजागृति) त्यांना तुम्ही मंदिर का उपलब्ध करून दिले ? त्यांना त्यांचा कार्यक्रम १ घंट्यामध्येच आटोपायला सांगा, तसेच अन्य जाती-धर्माविरुद्ध बोलू नका, असेही सांगा. ते जर तसे काही बोलले, तर आम्ही तुमच्या विरोधातही गुन्हा दाखल करू. इथून पुढे त्यांच्या उपक्रमांना मंदिर उपलब्ध करून द्यायचे नाही. या सगळ्या दमदाटीचा मंदिराच्या प्रमुखांनाही मानसिक त्रास झाला. (हिंदु जनजागृती समितीचे सर्व कार्य वैध मार्गाने चालू आहे. समितीचे कार्य समाजाला माहीत असल्याने धर्मकार्याला साहाय्य करणार्या मंदिराच्या प्रमुखांना दमदाटी करून हिंदु जनजागृती समितीची प्रतिमा मलीन करणे कितपत योग्य ? पोलिसांनी आपला वेळ राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटनांच्या कार्यावर ठेवण्यासाठी वाया घालवण्याऐवजी इसिससारख्या आतंकवादी संघटनांच्या जिहादी आतंकवाद्यांना शोधण्यासाठी वापरला असता, तर आतंकवाद संपण्यास साहाय्य तरी झाले असते ! – संपादक, हिन्दूजागृति)