Menu Close

नवरात्रोत्सव आणि मोहरमही डॉल्बीमुक्त करा ! – विश्‍वास नांगरे-पाटील

‘सर्व मशिदी भोंगेमुक्त करा’, असे विश्‍वास नांगरे-पाटील का म्हणत नाहीत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

कोल्हापूर : गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सव आणि मोहरमही डॉल्बीमुक्त झाला पाहिजे. त्यासाठी आवश्यक त्या प्रबोधनासह उपाययोजना करा. नावाची नव्हे, तर कामाची गुप्तचर पथके सिद्ध करा, असे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी पोलीस अधिकार्‍यांना दिले. कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांची १४ सप्टेंबरला विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीला पाचही जिल्ह्यांतील पोलीस अधीक्षक उपस्थित होते.(पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवून गणेशोत्सव डॉल्बीमुक्त केला, ही चांगली गोष्ट आहे; मात्र सर्वोच्च न्यायालयाने ‘नागरिकांना त्रास देणारे मशिदींवरील भोंगेही काढावेत’, असाही आदेश दिला आहे. त्याप्रमाणे विश्‍वास नांगरे-पाटील यांनी मशिदींवरील भोंगेही काढून नागरिकांना होणार्‍या भोंग्याच्या त्रासापासून मुक्त करावे, एवढीच हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

नांगरे-पाटील पुढे म्हणाले की,

१. गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करून कोल्हापूर परिक्षेत्राने एक नवा आदर्श घालून दिला आहे. हीच परंपरा कायम ठेवा. आगामी नवरात्रोत्सव आणि मोहरम सणही डॉल्बीमुक्तच झाला पाहिजे. त्यासाठी आवश्यक त्या मंडळांच्या बैठका घ्या. त्यांचे आणि आवश्यक त्या ठिकाणी प्रबोधन करून डॉल्बीमुक्त उत्सव, सण साजरे करा.

२. समाधानकारक काम नसल्याने गुप्तचर पथके पालटण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांद्वारे सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. नुसती नावाची गुप्तचर पथके नकोत, तर ती कामाची गुन्हेगारीला आळा घालणारी असली पाहिजेत. त्यासाठी कार्यक्षम अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करा.

३. कामात हलगर्जीपणा करणार्‍यांवर तातडीने कारवाई करा. कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारीचा आलेख (क्राईम रेट) अल्प झाला पाहिजे. ग्रामपंचायत निवडणुकीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, याची दक्षता घ्या.

४. गावागावांत जाऊन बैठका घ्या. त्याच धर्तीवर गुंडांना हद्दपार करा. मटका, जुगार, हातभट्टीसारखे अवैध व्यवसाय तातडीने बंद करा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *