ख्रिस्त्यांचा विरोध
नेपाळ हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी कायदा करण्याचा प्रयत्न करतो; मात्र भारत काहीही करत नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
काठमांडू (नेपाळ) : नेपाळमध्ये धर्मांतर रोखण्यासाठी नवीन कायदा करण्यात येणार आहे. या संदर्भातील विधेयक नेपाळच्या संसदेत सादर करण्यात आले असून पुढील वर्षी ते संमत करण्यात येणार आहे. हा कायदा नेपाळचे नागरिक आणि विदेशी नागरिक या दोघांसाठीही लागू असणार आहे. धर्मांतरासाठी बाध्य केल्यास ५ वर्षांच्या कारावासाची तरतूद यात करण्यात आली आहे, तसेच जर कोणी एखाद्याच्या धार्मिक भावना दुखावल्या तर त्याला २ सहस्र नेपाळी रुपयांचा दंड आणि २ वर्षांची शिक्षा होऊ शकते. न्यायमंत्री अग्नी खेल म्हणाले की, या कायद्याद्वारे ख्रिस्त्यांना लक्ष्य करण्यात येणार नाही.
१. या कायद्यामुळे ख्रिस्त्यांच्या धर्मगुरूंकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. नेपाळमधील खिस्त्यांच्या संघटनेचे अध्यक्ष पॉल सिमिक म्हणाले, “जो कोणी स्वतःहून पाद्य्रांकडे धर्मांतर करण्यास येतोे, तेव्हा आम्ही त्याच्या हेतुची चौकशी करतो. आम्ही कधीही कोणावर धर्मांतरासाठी दबाव टाकत नाही; मात्र आता या पाद्य्रांना भीती वाटू शकते.”
२. नेपाळच्या ख्रिस्ती संघाचे अध्यक्ष सी.बी. घटराज म्हणाले की, हा कायदा धार्मिक स्वातंत्र्यावर नियंत्रण आणणारा आहे. आम्ही याचा निषेध करतो. अल्पसंख्यकांना हिंदूंच्या पारंपरिक प्रथांचे पालन करण्यासाठी बाध्य केले गेले आहे. भेदभाव आणि अत्याचार यांमुळे लोक ख्रिस्ती धर्माकडे वळत आहेत. यामुळेच त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. आम्ही कोणावरही बळजोरी करत नाही. जर कोणी स्वतःहून येत असेल, तर आम्ही त्याला नकार देऊ शकत नाही.
३. ए.पी. या ख्रिस्ती पक्षाचे अध्यक्ष पाद्री भारत गिरि म्हणाले की, वाढत्या ख्रिस्ती लोकसंख्येचे विरोधात हे षड्यंत्र आहे. आमचे कार्य रोखले जाऊ शकत नाही. ईश्वर आमची रक्षा नक्कीच करील.
४. अंतर-विश्वास समूहाचे प्रमुख नजरूल हुसेन म्हणाले की, आम्ही या कायद्यास विरोध करू.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात