आतंकवादाला धर्म नसतो, असे म्हणणार्यांना चपराक !
जकार्ता (इंडोनेशिया) : इस्लाम आणि धर्मांधता यांचा संबंध नाही, असे म्हणणे पाश्चात्त्य नेत्यांनी बंद केले पाहिजे. धर्मांधता, आतंकवाद आणि मूलभूत इस्लामी धर्मांधता यांचा परस्परांशी संबंध आहे. जोपर्यंत आम्ही या संदर्भात जागरूक होणार नाही तोपर्यंत इस्लाममधील या हिंसेवर विजय मिळवू शकत नाही, असे परखड प्रतिपादन इंडोनेशियातील प्रमुख इस्लामी विचारवंत आणि नाहदलातुल उलमाचे सरचिटणीस असणारे याह्या चोलिल स्ताकफ यांनी अमेरिकेतील टाइम प्रसिद्ध नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. नाहदलातुल उलमाचे ५ कोटी सदस्य आहेत. ही इंडोनेशियातील सर्वांत मोठी इस्लामी संघटना आहे.
याहया पुढे म्हणाले की,
१. कट्टर इस्लाम ही कोणतीही नवीन गोष्ट नाही. इंडोनेशियाच्या इतिहासात हे सातत्याने दिसून आले आहे.
२. मुसलमान आणि मुसलमानेतरांशी संबंध, मुसलमानांचा राष्ट्राशी असलेला संबंध, ते जेथे रहातात तेथील कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंध यांवर विचार करण्याची आवश्यकता आहे. मुसलमानांचे मुसलमानेतरांशी नेहमीच शत्रूत्वाचे आणि फुटीरतेचे संबंध राहिले आहेत.
३. यामागे मध्ययुगातील काही घटना कारणीभूत असतील; मात्र जर मुसलमान याच विचारांनी आताही चालत असतील, तर २१ व्या शतकात शांती आणि सौहार्दता ते टिकवू शकत नाहीत.
४. सौदी अरेबिया आणि अन्य आखाती देश गेल्या ५० वर्षांपासून इस्लामी कट्टरतेला खतपाणी घालत आहेत. आतातरी पाश्चात्त्य देशांनी सौदी अरेबियावर या संदर्भात दबाव निर्माण करून ते थांबवले पाहिजे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात