पुणे महानगरपालिकेचा ढोंगीपणा पुन्हा उघड !
पुणे : महानगरपालिकेने भाविकांचा विरोध झुगारून कृत्रिम हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा आग्रह धरला होता. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत नदीकाठांवर अनुमाने ५७ ठिकाणी कृत्रिम हौद बांधण्यात आले. मूर्ती विरघळण्यासाठी म्हणून कृत्रिम हौदांतील पाण्यात अमोनियम बायकार्बोनेट पण घातले गेले; पण कृत्रिम हौदांतील गणेशमूर्ती महानगरपालिकेकडून हिंदूंच्या धर्मभावना दुखावत वाघोलीजवळील खाणीत विसर्जित करण्यात आल्या. गणेशोत्सव संपल्यानंतर मात्र भिडे पुलाजवळ कृत्रिम हौदातील गणेशमूर्तींचे अवशेष, तसेच गाळ टेम्पोमधून पुन्हा नदीत विसर्जित केल्याचे उघडकीस आले. (कृत्रिम हौद म्हणजे हिंदूंच्या धर्मभावना दुखावणाराच उपक्रम असून महापालिकेचा भोंगळ कारभार त्यातून दिसून येतो. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात