म्हापसा : बिलिव्हर्सपंथीय पास्टर डॉम्निक यांची पत्नी जुआव डिसोझा हिने कायसूव येथील धर्माभिमानी श्री. अंकित साळगावकर यांच्या विरोधात पाठलाग करून सतावणूक केल्याची खोटी तक्रार केली होती. या खटल्यातून म्हापसा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांनी धर्माभिमानी श्री. अंकित साळगावकर यांची निर्दोष मुक्तता केली आहे. (खोटी तक्रार दाखल करून श्री. अंकित साळगावकर यांची अपकीर्ती केल्याविषयी आणि त्यांना मनःस्ताप दिल्याविषयी बिलिव्हर्सवाल्यांवर कारवाई व्हायला हवी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) धर्माभिमानी अधिवक्ता सर्वज्ञ पाटील यांनी अंकित साळगावकर यांची बाजू मांडली. पाठलाग करणे, सतावणूक करणे यासाठीच्या भारतीय दंड संहिता कलम ३५४ खाली अंकित साळगावकर यांच्या विरोधात जुआव डिसोझा या महिलेने तक्रार केल्यानंतर अंकित साळगावकर यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर अंकित यांना जामिनावर सोडून देण्यात आले होते. अंकित यांच्या विरोधात कुठलाही पुरावा नसल्याने त्यांची निर्दोष सुटका करण्याचा आदेश म्हापसा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांनी दिला आहे. केवळ सतावणूक करण्यासाठी बिलिव्हर्सवाल्यांकडून अंकित साळगावकर यांच्या विरोधात अनेक खोट्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. यापूर्वी अंकित यांच्यावर बिलिव्हर्सची बसगाडी फोडल्याची खोटी तक्रार करण्यात आली होती. तसेच फेसबूक या सामाजिक संकेतस्थळावर बिलिव्हर्सपंथीयांच्या विरोधात टिपणी करत असल्याचा आरोप करून बिलिव्हर्ससमर्थक महिलांनी अंकित यांच्या विरोधात तक्रार केली होती. तसेच निवडणूक आयोगाकडेही अंकित यांच्याविरोधात निखिल शेट्ये या बिलिव्हर्स समर्थकाने अंकित हा राजकीयदृष्ट्या प्रचार करत आहे, अशी तक्रार केली होती.
सतावणुकीला न घाबरता बिलिव्हर्सवाल्यांच्या विरोधात आंदोलन आणखी तीव्र करणार ! – धर्माभिमानी अंकित साळगावकर यांचा निर्धार
हिंदु धर्माच्या रक्षणासाठी कुठल्याही सतावणुकीला सामोरे जाण्यासाठी मी सिद्ध आहे. मी स्वखर्चाने माझ्या विरोधातील न्यायालयीन लढा दिला आणि आरोपातून निर्दोष सुटलो. मी बिलिव्हर्सपंथीयांच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा उभारला आहे. माझ्या विरोधात तक्रार दाखल केल्याने मी थांबेन, अशा भ्रमात या बिलिव्हर्सवाल्यांनी राहू नये. यापूर्वीही माझ्या विरोधात अनेक तक्रारी या बिलिव्हर्सवाल्यांनी केल्या आहेत. अशा सतावणुकीमुळे माझा बिलिव्हर्सच्या विरोधात कृती करण्याचा निर्णय आणखी दृढ झाला आहे, अशी प्रतिक्रिया धर्माभिमानी श्री. अंकित साळगावकर यांनी व्यक्त केली आहे. (असे धर्माभिमानी आणि त्यागी वृत्तीचे युवक हीच हिंदु धर्माची शक्ती आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात