सातारा : वैज्ञानिक जाणिवा निर्माण करत तथाकथित पुरो(अधो)गामी हिंदु धर्म आणि संस्कती यांचे भंजन करत आहेत. जगातील सर्वश्रेष्ठ समजला जाणारा हिंदु धर्म आणि संस्कृती, प्रथा आणि परंपरा यांना बुद्धीने छेद देऊन तथाकथित पुरो(अधो)गामी हिंदूंना धर्म आणि संस्कृती यांच्यापासून दूर नेऊ पहात आहेत. यासाठी हिंदूंनो, बौद्धिक क्षत्रिय व्हा, असे आवाहन सोलापूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांनी केले.
लिंब-गोवे (जिल्हा सातारा) येथील एका कार्यक्रमात त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमापूर्वी दैनिक सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे यांनी त्यांची भेट घेतली. श्रीमती अपर्णा रामतीर्थकर पुढे म्हणाल्या की,
१. लव्ह जिहादच्या प्रकरणात हिंदू मुली भरडल्या जात असून पालकांचेही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रथमत: पालकांनी स्वत:च्या आचरणातून मुलींपुढे आदर्श निर्माण करणे आवश्यक आहे.
२. महिलांनी सामाजिक भान ठेवावे. पुरुष बनण्याच्या फंदात पडू नये. केस कापणे, जीन्स घालणे आदी गोष्टी टाळून स्त्रीसुलभ भावनांचे दर्शन स्वतःच्या ठायी भिनवावे. समाजानेही महिलांना शिकवावे; मात्र तिच्यात सीतेचे गुण अंगी बाणवण्याचे प्रयत्न करावेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात