संस्कृतचा र्हास होण्यास त्याचे मोल नसलेले काँग्रेसी राज्यकर्तेच कारणीभूत आहेत. संस्कृत भाषा वाचवण्यासाठी आता हिंदूंनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे !
नवी देहली : भारतातील सर्वांत प्राचीन भाषा असलेल्या संस्कृत भाषेचे पुनरुज्जीवन करण्याचा निश्चय श्री. राकेशकुमार मिश्रा यांनी केला आहे. हाच ध्यास मनाशी बाळगून श्री. मिश्रा हे अहोरात्र मेहनत घेत आहेत. भारतात अनेक भाषा आहेत. प्रत्येक प्रांताची मातृभाषा आहे; पण संस्कृत ही भारतातील सर्वांत प्राचीन आणि मुख्य भाषा आहे. भातातील केवळ १४ सहस्र लोक संस्कृत भाषा बोलतात. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण नगण्य आहे. भारतात अनेक भाषा प्रचलित आहेत. सुमारे ४ सहस्र वर्षे प्राचीन असलेल्या संस्कृत भाषेचा र्हास होत चालला आहे. प्राचीन काळातील सर्व धर्मग्रंथ याच भाषेतून लिहिले गेले. दुर्दैवाने पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे तथा अपेक्षित राजाश्रयाच्या अभावामुळे संस्कृत भाषा मृतवत् होत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात