Menu Close

ममता बॅनर्जी यांची हिंदु संघटनांना चेतावणी, ‘शस्त्रपूजनाचा कार्यक्रम करून बंगालची शांतता भंग करू नका !’

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुर्गापुजेवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजप यांना चेतावणी दिली आहे की, शस्त्र पूजनाचा कार्यक्रम साजरा करुन बंगालची शांतता भंग करू नका. कोणत्याही प्रकारची हिंसा झाली, तर तुम्ही आगीशी खेळत आहात हे लक्षात ठेवा.

यावर्षी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मोहरम असल्याने दोन्ही मिरवणुका समोरासमोर आल्या, तर तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे मोहरमच्या दिवशी मूर्ती विसर्जन होणार नाही, असे ममता यांनी स्पष्ट केले आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, बंगालमध्ये दुर्गापुजा पारंपारिक रूपात साजरी केली जाते. त्यांचे सरकार येत्या दुर्गापूजा उत्सवामध्ये शांतता आणि सलोखा जपण्यासाठी संकल्पबद्ध आहे. कोणीही येथील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कठाेर कारवार्इ केली जार्इल. प्रशासन राज्यात शस्त्रासह मूर्ती विसर्जन मिरवणूकीला अनुमती नाही देणार. त्यांनी मुसलमानांना मोहरमची मिरवणूक शांततापूर्वक काढण्याचे आवाहन केले आहे.

विश्व हिंदू परिषदेने म्हटले होते की, आम्ही संपूर्ण राज्यात शस्त्र पूजनाचा कार्यक्रम करणार आहोत, यावर ममता यांनी वरील चेतावणी दिली आहे.

बंगालमध्ये सतत सांप्रदायिक हिंसा होत असते या वेळी ममता शांतता आणि सलोखा जपण्याचा संकल्प करणे का विसरतात ? मूर्ती विसर्जनाच्या वेळी हिंदूंनी काय करावे ?, काय करू नये ? याची चेतावणी देणाऱ्या ममता बॅनर्जी मोहरमची मिरवणूक शांततेत काढण्याचे केवळ आवाहन करतात. यावरुन ममता यांचा हिंदुद्वेष आणि दुटप्पीपणा दिसून येतो.

बंगालमध्ये दुर्गापुजा पारंपारिक रूपात साजरी केली जाते, असे म्हणणाऱ्या ममता यांना हे माहीत नाही का कि विजयादशमीला शस्त्र पूजा करणे ही हिंदूंची परंपरा आहे आणि त्यामागे धर्मशास्त्र आहे. हिंदु शस्त्राला देवतेचे रुप मानुन त्याची पूजा करतात. हिंदु धर्म हिंसेला कधीच प्रोत्साहन देत नाही. हिंदूंच्या धर्म परंपरांवर निर्बंध लावणाऱ्या ममता बॅनर्जी उद्या विजयादशमीवरच निर्बंध लावतील.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *