अकोला : येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ‘बंगालमध्ये ‘मोहरम’च्या निमित्ताने नवरात्रीत ‘श्री दुर्गा विसर्जना’वर घातलेली बंदी हा धार्मिक पक्षपात आहे, तसेच हिंदु युवतींचे शोषण करणारा ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी कठोर कायदा करा, या विषयांवर राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर निवासी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
मुसलमानांच्या सणांसाठी हिंदूंच्या उत्सवांवर बंदी घालणे, हा धार्मिक पक्षपात – श्याम सांगुनवेढे आणि सौ. माधुरी मोरे
‘धर्मनिरपेक्ष म्हणवल्या जाणार्या देशात सर्व धर्मियांना आपापल्या पद्धतीने उपासनेचे स्वातंत्र्य घटनेने दिले असतांना बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार मात्र हिंदूंच्या धार्मिक भावनांना वारंवार पायदळी तुडवत आहे. ममता सरकारने मोहरमचे कारण पुढे करून यंदाच्या वर्षी श्री दुर्गा मूर्ती विसर्जनावर एक दिवसाची बंदी घातली आहे. अशा प्रकारे मुसलमानांच्या सणांसाठी हिंदूंच्या उत्सवांवर बंदी घालणे, हा धार्मिक पक्षपात आहे, अशी परखड टीका हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्याम सांगुनवेढे आणि सौ. माधुरी मोरे यांनी या वेळी केली. ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी कठोर कायदा करावा’, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. आंदोलनात स्वाक्षरीद्वारे जनतेने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात