अशा प्रकारे शासकीय प्रकल्पासाठी मशीद किंवा चर्च पाडण्याचे धैर्य ठेकेदार आणि पालिका दाखवील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे : शहरातील मंगळवारपेठ भागात महानगरपालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एस्.आर्.ए.) प्रकल्पाचे बांधकाम करतांना प्रकल्पाच्या ठेकेदाराने येथील पुरातन शिवमंदिराचे बांधकाम पाडले. या प्रकरणी पतितपावन संघटनेच्या वतीने शहरप्रमुख श्री. सीताराम खाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. हिंदूंच्या भावना दुखावल्याविषयी ठेकेदारावर त्वरित कारवाई व्हावी आणि शिवमंदिर पूर्ववत उभे करून द्यावे, अशी मागणी आंदोलनाच्या वेळी करण्यात आली आणि पालिकेचाही निषेध करण्यात आला. या वेळी सरचिटणीस श्री. मनोज पवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संबंधित ठेकेदाराच्या प्रतिनिधीने मंदिराची पूर्ववत् उभारणी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (हिंदूंवर झालेल्या आघातांविषयी त्वरित संघटित होऊन धर्मरक्षण करणार्या पतित पावन संघटना आणि स्थानिक नागरिक यांचे अभिनंदन ! सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदू अशा प्रकारे संघटित झाल्यास धर्मावरील आघात निश्चितच थांबतील ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
मंदिर पाडणार्या प्रशासनातील उत्तरदायी अधिकार्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पावले उचला आणि अशा अधिकार्यांची नावे सनातन प्रभातलाही कळवा. – संपादक, दैनिक सनातन प्रभात
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात