Menu Close

शिवछत्रपतींच्या डुडलसाठी शिवप्रेमींकडून ‘सोशल’ मोहीम

मुंबई : आता अवघ्या काही दिवसांवर शिवजयंती येऊन ठेपली असून गुगलच्या होम पेजवर शिवजयंतीला शिवाजी महाराजांचे छायाचित्र डुडल म्हणून असावे यासाठी शिवप्रेमी जोरदार प्रयत्न करत आहेत.

शिवाजी महारांजाचा डुडल गुगलने तयार करावा यासाठी [email protected] या ई-मेलवर मेल पाठवले जात आहेत, तसेच शिवप्रेमी महाराजांच्या डुडलसाठी goo.gl/FmTgNh या लिंकवर या डुडलला समर्थन देऊ शकतात. फेसबूक, ट्विटरवरही #DoodleofShivray या हॅशटॅगद्वारे ही मोहीम सुरु आहे.

गुगल आपल्या होम पेजवर खासदिनानिमित्त विज्ञान, इतिहास, साहित्य, कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महान काम करणाऱ्या व्यक्तींचे डुडल बनवते.

संदर्भ : माझा पेपर

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *