Menu Close

हिंदु नावे धारण करून फेसबूकवर हिंदु मुलींशी अश्‍लील संभाषण करणार्‍या ७ मुसलमान युवकांना अटक

  • हिंदु मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवण्याची आणखी एक पद्धत ! 
  • लव्ह जिहादला विरोध करणारे नेहमीच तेे प्रेम आहे. त्याला धर्माचे नाव देऊ नका, असे म्हणण्याचा प्रयत्न करत असतात; मात्र अशी फसवणूक कधी प्रेम असू शकतेे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

चंबा (उत्तराखंड) : उत्तराखंडच्या चंबामध्ये हिंदु मुलींना फेसबूकवरून अश्‍लील संदेश पाठवणार्‍या ७ मुसलमान युवकांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रिझवान खान, सलमान, महंमद वारीश, शबीर कासीम, अबुल कलाम, सलमान आणि महंमद शबीर यांचा समावेश आहे. सामाजिक माध्यमातून अश्‍लील टिप्पणी करणे आणि धार्मिक सलोखा बिघडवणे या आरोपांखाली त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

या प्रकरणी आंदोलन करणार्‍या जमावाने मुलींना अश्‍लील संदेश पाठवणार्‍या युवकांपैकी दोघांना पकडून पोलीस ठाण्यामध्ये आणल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. पोलिसांनी नंतर सर्व सातही आरोपींना अटक केली. या घटनेविषयी माहिती कळताच स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या घटनेच्या निषेधार्थ स्थानिक बाजारपेठ ३ घंटे बंद ठेवण्यात आली होती. हे आरोपी हिंदु नाव धारण करून बनावट प्रोफाइल बनवत होते आणि त्याद्वारे हिंदु मुलींशी चॅट करत होते. या प्रकरणी पोलीस तपास चालू आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *