जळगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
जळगाव : हिंदूंच्या धर्मस्वातंत्र्यावर गदा आणणारे बंगाल सरकार बरखास्त करून ममता बॅनर्जी यांना कह्यात घेण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय पाटील यांनी शहरातील महानगरपालिकेजवळ झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात केले. मोहरमच्या पार्श्वभूमीवर हिंदूंचे होणारे हनन खपवून घेतले जाणार नाही. दुर्गाविसर्जन ठरलेल्या दिवशीच करण्यात यावे. तसेच केंद्र सरकारने या प्रकरणी हस्तक्षेप करून श्री दुर्गामूर्ती विसर्जनावर घातलेली बंदी त्वरित उठवावी आणि ममता सरकारला याविषयी खडसवावे, असेही ते म्हणाले. आंदोलनाला ४५ हून अधिक धर्मप्रेमींची उपस्थिती होती.
रणरागिणीच्या कु. तेजस्विनी तांबट यांनी सांगितले, लव्ह जिहाद ही आंतरराष्ट्रीय समस्या आहे. हा विषय संवेदनशील असून याविषयी शासनाने गंभीर नोंद घेतली पाहिजे. सहस्रो हिंदु तरुणी या जिहादला बळी पडल्या असून याद्वारे मोठ्या प्रमाणात धर्मांतर केले जाते. याची पाळेमुळे खणून काढून लव्ह जिहाद मुळासहित नष्ट करावा. आंदोलनानंतर अप्पर जिल्हाधिकारी श्री. राहुल मुंडके यांना निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे श्री. विजय पाटील, रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे, कु. तेजस्विनी तांबट, कु. दीक्षा नागणे, कु. प्रेरणा पाटील यांच्यासह अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते.
क्षणचित्र
रस्त्यावरून येणार्या-जाणार्या अनेकांनी, तसेच तीन स्थानिक वृत्तवाहिन्यांनीही आंदोलनाचे ध्वनीचित्रीकरण केले.
नाशिक येथेही राष्ट्रीय हिंदू आंदोलन
वरील विषयाच्या अनुषंगाने नाशिक येथेही १६ सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात