-
कोल्हापूर येथील सौ. पूजा महाडिक खून प्रकरण
-
विशेष सरकारी अधिवक्ता उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – मोर्च्यातील महिलांची मागणी
कोल्हापूर : शास्त्रीनगर येथे धर्मांध आफताब सरकवास (वय १६ वर्षे) याने ६ सप्टेंबरला दुपारी ४ वाजता सौ. पूजा महाडिक यांचा त्यांच्या रहात्या घरात धारधार शस्त्राने खून केला. या प्रकरणी पूजा महाडिक यांना न्याय मिळण्यासाठी आणि धर्मांध आफताब याला फाशीची शिक्षा होण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन १६ सप्टेंबरला मूक मोर्चा काढला. ‘मला न्याय द्या, हा खटला जलदगती न्यायालयात चालवा’, असे फलक घेऊन मोठ्या संख्येने महिला मोर्च्यात सहभागी झाल्या. शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनाही निवेदन देण्यात आले. ‘योग्य ते अन्वेषण करून हा खटला फास्ट ट्रॅक (जलदगती न्यायालयात) चालवण्यासाठी प्रयत्न केले जातील’, असे आश्वासन डॉ. अमृतकर यांनी दिले.
आफताब सौ. महाडिक यांच्या घरात घुसून त्यांची छायाचित्रे भ्रमणभाषवर काढत होता. सौ. महाडिक यांनी त्याला विरोध केल्यानंतर आफताबने चिडून त्यांच्यावर वार केले. पोलिसांनी त्याचा भ्रमणसंगणक आणि भ्रमणभाष जप्त केला. भ्रमणसंगणक आणि भ्रमणभाष घेऊन पलायन करणार्या संशयिताच्या काही नातेवाइकांचीही चौकशी करण्यात यावी, त्यात पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून आल्यास संबंधितांनाही खुनाच्या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी सौ. पूजा महाडिक यांचे पती आणि कुटुंबीय यांनी केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात