हिंदु जनजागृती समितीचे पोलिसांना निवेदन
मिरज : सध्या सार्वजनिक नवरात्रोत्सवात अनेक अपप्रकार शिरले आहेत. चित्रपटगीतांच्या तालावर गरबा खेळणे, मद्यपान करणे, अश्लील अंगविक्षेप करत नाचणे, बळजोरीने वर्गणी गोळा करणे, सजावटीवर अनाठायी व्यय करणे, मंडपात जुगार खेळणे आदी कारणांनी उत्सवाचे पावित्र्यही नष्ट होत आहे. हे अपप्रकार थांबवण्यासाठी दांडिया आणि नवरात्रोत्सव समारंभाच्या ठिकाणी ओळखपत्र पडताळूनच प्रवेश देण्याची व्यवस्था करणे, तसेच अन्य प्रयत्न पोलीस प्रशासनाकडूनही व्हावेत, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मिरज शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेना सहकार सेनेचे श्री. पंडितराव (तात्या) कराडे यांसह हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात