१. मोठ्या आस्थापनात राष्ट्रध्वजाचा मान राखा याविषयी मल्याळम् भाषेतील ध्वनीचित्र चकती दाखवणे
एर्नाकुलम् जिल्ह्यातील शीतकपाटे (फ्रीज), दूरचित्रवाणी संच इत्यादी वस्तू विकणार्या एका मोठ्या आस्थापनाला संपर्क केला होता. त्यांची केरळ येथील ४ जिल्ह्यांत शोरूम आहेत. तेथील अधिकार्यांना राष्ट्रध्वजाचा मान राखा याविषयी मल्याळम् भाषेत काढलेली ध्वनीचित्र चकती दाखवली असता त्यांनी त्यांच्या सर्व शोरूममध्येे ३ दिवस (१३.८ ते १५.८.२०१७ या काळात) ही ध्वनीचित्र चकती दाखवली जाईल, असे सांगितले.
२. जिल्हा शिक्षण अधिकार्यांचा लाभलेला सकारात्मक प्रतिसाद
एर्नाकुलम् येथील जिल्हा शिक्षण अधिकार्यांना समितीचे कार्यकर्ते भेटायला गेले असता त्यांच्या खाजगी सचिवांची (पी.ए.ची) भेट झाली. त्यांना शाळांत प्लास्टिक ध्वज न वापरण्याच्या संदर्भात निवेदन देण्यात आले. त्यांना विषय आवडला असून एकूण १६० शाळांना ते निवेदन पाठवणार आहेत.
– कु. प्रणिता सुखटणकर, केरळ (१८.८.२०१७)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात