- अनेक पिढ्यांपासून रहात आहेत, तेथेच देशविरोधी कारवाया करणारे रोहिंग्या मुसलमान भारतात आश्रयाला आले, तर भारतातही देशविरोधी कारवाया करतील, हे त्यांचे समर्थन करणार्यांना कळत नाही का ?
- बांगलादेशमध्ये ४ लाख रोहिंग्या मुसलमान छावण्यांमध्ये रहात आहेत. भारताने रोहिंग्यांना आश्रय देण्याचे मान्य केल्यास हे ४ लाख रोहिंग्या बांगलादेशमधून भारतात येतील आणि त्यांच्यासह बांगलादेशी घुसखोरही येतील, हे त्यांच्यासाठी गळा काढणार्या निधर्मीवाद्यांना कळत नाही का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
यांगून (म्यानमार) : रोहिंग्या मुसलमानांनी देशविरोधी कारवाया केल्या आहेत. म्यानमारमध्येही त्यांनी आक्रमणे केली आहेत. रोहिंग्यांना म्यानमारमध्ये आश्रय दिला; पण त्याचा परिणाम काय झाला ? (म्यानमारने अनुभवलेली स्थिती भारताने कधीही अनुभवू नये याचसाठी भारतातील ४० सहस्र रोहिंग्यांना हाकलेच पाहिजे, यामध्ये कोणी अडथळा आणत असेल, तर त्यांनाही रोहिंग्यासोबत हाकलून दिले पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)आंतरराष्ट्रीय समुदायाकडून होत असलेल्या टीकेला आम्ही घाबरत नाही, असे परखड स्पष्टीकरण म्यानमारच्या स्टेट काऊन्सिलर आँग सान स्यू की यांनी रोहिंग्यावरील कारवाईवरून होत असलेल्या टीकेवर दिले. (आतंकवादाच्या विरोधात कारवाई करतांना ‘जग काय म्हणेल?’ याची नेहमीच चिंता करणार्या भारताला म्यानमारकडून शिकायला हवे ! आँग सान स्यू कीसारखे प्रमुख भारताला मिळाले असते, तर काश्मीरमधील आतंकवाद्यांची आणि दगडफेक करणार्यांचा आतंकवाद केव्हाच संपुष्टात आला असतांना आणि त्यांना देश सोडून पलायन करावे लागले असते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) आमची सुरक्षादले कोणत्याही परिस्थितीचा आणि आतंकवादासारख्या संकटाचा सामना करण्यास सक्षम आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. म्यानमारची राजधानी न्या पी डॉव येथे राष्ट्रीय एकात्मता आणि शांतता यांवर आयोजित सभेत आँग सान स्यू की बोलत होत्या. प्रथमच रोहिंग्यांच्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली.
आँग सान स्यू की यांनी मांडलेली सूत्रे
१. गेल्या वर्षभरापासून म्यानमारमध्ये होत असलेल्या हिंसाचाराला रोहिंग्या मुसलमानच उत्तरदायी आहेत. (भारतातील एकतरी राजकारणी असे म्हणण्याचे धाडस दाखवतो का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) मुसलमान कट्टरपंथियांकडून पोलीस ठाण्यांना लक्ष्य केले जात आहे. आताचा हिंसाचार २५ ऑगस्ट या दिवशी पोलीस ठाण्यांवर रोहिंग्या मुसलमानांनी केलेल्या आक्रमणामुळेच भडकला आहे. अनेकांची घरेही जाळण्यात आली. त्यामुळे ‘रोहिंग्या साल्वेशन आर्मी’ला आतंकवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे. आतंकवादी कारवायांमध्ये त्यांचा हात आहे. देशहित डोळ्यांसमोर ठेवूनच त्यांच्यावर कारवाई होत आहे. (देशहित डोळ्यांसमोर ठेवून आतंकवाद्यांवर भारतात कारवाई झाली असती, तर आज भारत आतंकवादमुक्त देश झाला असता ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) म्यानमारमध्ये कायदा-सुव्यवस्था आणि स्थैर्य राखण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
२. म्यानमारमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होत असेल, तर ते चिंताजनक आहे; मात्र एका घटनेवरून म्यानमारविषयी रंगवले जाणारे चित्र चुकीचे आहे. जगाने एका छोट्या भागातील हिंसाचारावरून म्यानमारचे मूल्यमापन करू नये. म्यानमारकडे देश म्हणून पहावे.
३. जे लोक येथून पलायन करत आहेत, त्यांच्याशी संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशातील सामाजिक परिस्थिती खूपच बिकट आहे. या परिस्थितीचा आम्ही सामना करत आहोत. सरकार शांतता प्रस्थापित करण्यासाठी ठोस पावले उचलत आहे. देशात शांतता नांदावी यासाठी केंद्रीय समितीची स्थापना केली आहे.
४. हिंसाचारानंतर ज्यांना घरे सोडावी लागली, त्यांच्याविषयी आम्हाला सहानुभूती आहे. देशात परतण्याची इच्छा असलेल्यांना सामावून घेण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे.
५. म्यानमारमध्ये आजही अनेक गावांमध्ये मुसलमान रहात आहेत. हिंसाचारानंतरही त्यांनी त्यांचे गाव, घर सोडलेले नाही. हवे असल्यास आंतरराष्ट्रीय समुदायाने म्यानमारमध्ये येऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात