फलटण (जिल्हा सातारा) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
फलटण (जिल्हा सातारा) : भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हटले जाते. सर्वांना त्यांच्या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य राज्यघटनेने दिले आहे; मात्र ते तुडवून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री हिंदूंच्या स्वातंत्र्यावर गदा आणून आपली मनमानी करत आहेत. त्यांनी दिलेला श्री दुर्गा विसर्जनावरील बंदीचा आदेश उठवून सर्व हिंदूंना केंद्र सरकारने न्याय द्यावा, असे मनोगत भाजपचे श्री. ज्योतीराम गोरे यांनी व्यक्त केले. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे १६ सप्टेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
भारतात ‘लव्ह जिहाद’ची गंभीर समस्या निर्माण होऊन धर्मांध मुसलमानेतर मुलींना धर्मांतरीत करण्याचे षड्यंत्र रचत असून त्यात हिंदू मुली मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. यासाठी सरकारने ठोस उपाययोजना काढावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. आशिष कापसे यांनी या वेळी केली. या वेळी ५० धर्मप्रेमी उपस्थित होते. आंदोलनानंतर तहसीलदार श्री. विजय पाटील यांना निवेदन देण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात