Menu Close

गुजरातमध्ये निरोधाच्या विज्ञापनासाठी नवरात्रीचा उल्लेख

सामाजिक माध्यमांतून विरोध

गुजरातमधील भाजप सरकारने स्वतःहून हे फलक काढून टाकले पाहिजेत आणि संबंधितांवर धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी कारवाई केली पाहिजे, अशी धर्माभिमानी हिंदूंची अपेक्षा आहे !

कर्णावती : येथे एका आस्थापनाच्या निरोध उत्पादनाच्या विज्ञापनाचे फलक लावण्यात आले आहेत. अश्‍लील चित्रपटांतील अभिनेत्री सनी लियोन हिचे छायाचित्र या विज्ञापनात आहे. या विज्ञापनात गुजराती भाषेत लिहिले आहे की, ‘या नवरात्रीत खेळा; मात्र प्रेमाने !’ सनी लियोन या आस्थापनाची ब्रँड अ‍ॅम्बेसॅडर आहे. सामाजिक माध्यमांतून याला विरोध केला जात आहे. तसेच हे फलक लवकरात लवकर हटवण्याची मागणी करण्यात येत आहे.

या फलकावर आक्षेप घेणार्‍या अतीत पटेल नावाच्या व्यक्तीने प्रसारमाध्यमांना सांगितले की, मी हे फलक स्वतः पाहिले. त्यातला मजकूर आणि नवरात्रीशी जोडलेला संबंध मला अश्‍लील वाटला. या ९ रात्री प्रेमाच्या नसून हा सण नृत्य करणे आणि शक्तीशी संबंधित अनेक रितीरिवाजांना जागवणारा आहे. जर आस्थापनाला विज्ञापन करायचे असेल, तर ते वेगळ्या प्रकारे करता येईल. त्याचा नवरात्रीशी संबंध जोडणे चुकीचे आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *