कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची कृती
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंदिरांवर कारवाई करणारे अवैध भोंग्यांच्या विरोधातील न्यायालयाचा आदेश कधी कृतीत आणणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कल्याण : कल्याण (पूर्व) येथील ३७ वर्षे जुने प्रसिद्ध श्री गणपति मंदिर रस्त्यात येत असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १९ सप्टेंबरला सकाळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पथकाने कडेकोट पोलीस बंदोबस्तात भूमीगत केले.
न्यायालयाने गणपति मंदिर पाडण्याविषयी स्थगिती दिली असतांना पालिकेने मंदिर पाडल्याने न्यायालयाचा अवमान केला आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार आहोत, असे हनुमान सेवा मंडळाचे विश्वस्त श्री. विष्णु जाधव यांनी सांगितले. (शासनाला भोंग्यांवर कारवाई केल्यास कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशी भीती वाटते. मंदिरांवर कारवाई करतांना हिंदूंकडून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारी स्थिती निर्माण होणार नाही, याची शासनाला निश्चिती असते. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या वेळी अनेक गणेशभक्तांच्या भावना अनावर झाल्या होत्या. मंदिर पाडण्यापूर्वी श्री गणेशाची मूर्ती सन्मानपूर्वक प्रभागक्षेत्र कार्यालयात नेण्यात आली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात