सोलापूर : दांडिया आणि नवरात्रोत्सव समारंभाच्या ठिकाणी ओळखपत्र पडताळूनच प्रवेश देण्याची व्यवस्था करावी आणि नवरात्रोत्सवातील अपप्रकार रोखावे या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर येथील पोलीस आयुक्त एम्.डी. तांबडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी विश्वेश्वर गड्डम, विलास पोतु, चंद्रकांत बद्दल, सतीश कुंचपोर, रमेश पांढरे, राजन बुणगे, विनोद रसाळ आणि दत्तात्रय पिसे आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, भारतीय संस्कृतीचे जतन करणे, तसेच समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणे या उद्देशाने सार्वजनिक नवरात्रोत्सवाला आरंभ झाला; मात्र सध्या सार्वजनिक नवरात्रोत्सवात मंडपात जुगार खेळणे, बळजोरीने वर्गणी गोळा करणे, सजावटीवर अनाठायी खर्च करणे अशा प्रकारांमुळे उत्सवाचे पावित्र्य नष्ट होत आहे. देशाला आतंकवादी कारवाया आणि धर्मांधांकडून दंगली यांचा धोका कायम आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क रहाणे आवश्यक आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात