सांगली : गडकोट किल्ले ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या सिंहगडासारख्या किल्ल्याच्या डागडुजीच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. तरी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी त्वरित लक्ष देऊन सिंहगड किल्ल्यावरील बांधकामात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे पदाधिकारी आणि श्रीशिवप्रतिष्ठानचे धारकरी श्री. नितीन काळे यांनी केली. हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने अपर जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण यांना १९ सप्टेंबर या दिवशी निवेदन देण्यात आले, त्या वेळी ही मागणी त्यांनी केली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री संतोष देसाई, गोविंद कुलकर्णी यांसह अन्य उपस्थित होते.
या वेळी शासनाकडे करण्यात आलेल्या अन्य मागण्या..
१. सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवण्यात प्रशासनाने पुढाकार घ्यावा.
२. बंगालमध्ये मोहरमच्या निमित्ताने नवरात्रीमध्ये श्री दुर्गा विसर्जनावर घातलेली बंदी उठवावी.
३. लव्ह जिहादच्या भीषण समस्येविषयी प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात