Menu Close

लव्ह जिहादच्या भीषण समस्येविषयी प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना काढावी ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

कागल (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

डावीकडे तहसीलदार श्री. किशोर घाडगे यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

कागल (जिल्हा कोल्हापूर) : लव्ह जिहादच्या भीषण समस्येविषयी प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करावी, या मागणीचे निवेदन येथील तहसीलदार श्री. किशोर घाडगे यांना १८ सप्टेंबरला देण्यात आले. या वेळी शिवसेनेचे कागल शहरप्रमुख श्री. किरण कुलकर्णी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री अर्जुन केसरकर, किरण चव्हाण, दशरथ डोंगळे, राजेश केसरकर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री कृष्णा निकम, अजय लोहार, अक्षय बुरसे, संतोष सणगर, आदित्य शास्त्री हे उपस्थित होते.

क्षणचित्र :

भर पावसातही धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. (असे हिंदुत्वनिष्ठ सर्वत्र हवेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

विना वेशातील एक पोलीस निवेदन देण्याआधीपासून आणि निवेदन देईपर्यंत उपस्थित राहून हिंदुत्वनिष्ठांचे निरीक्षण करत होता. त्याने हिंदुत्वनिष्ठांची चौकशी करून त्यांची छायाचित्रेही काढली. (हाच वेळ गुन्हेगारांच्या शोधार्थ वापरल्यास शहरातील गुन्हेगारी अल्प होईल ! पोलिसांच्या अशा वर्तणुकीमुळे हिंदूंचा पोलिसांवरील विश्‍वास डळमळीत झाला आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *