Menu Close

जर मूर्तीविसर्जनावर बंधन घालणे लांगूलचालन आहे, तर मी मरेपर्यंत करत रहाणार ! –

ममता(बानो) बॅनर्जी यांचा उद्दामपण कायम !

बंगालमधील हिंदूंना मिळालेली ही शिक्षाच होय ! अशा प्रकारच्या शासनकर्त्यांना निवडून देऊन स्वतःच्या धर्मावर आघात करून घेणार्‍या बंगालमधील  हिंदूंनी साधना केली, तर अशा शासनकर्त्यांना सत्ताच्युत होण्यास वेळ लागणार नाही !

कोलकाता : जर मोहरमसाठी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या विसर्जनावर बंधन घालणे हा मुसलमानांचे लांगूलचालन केल्याचा भाग असेल, तर जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत ते करत रहाणार. जर माझ्या डोक्यावर कोणी बंदूकही ठेवली, तरी मी तसेच करीन. मी कोणताही भेदभाव करत नाही. ही बंगालची संस्कृती आणि माझी संस्कृती आहे, असे उद्दाम विधान बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी येथील एका नवरात्री मंडळाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी केले. कोलकाता उच्च न्यायालयाने बंगाल सरकारचा मूर्ती विसर्जनाविषयीचा आदेश रहित करण्याच्या काही घंट्यांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी हे विधान केले होते.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘‘जेव्हा मी दुर्गा अथवा गणेशोत्सवाचे उद्घाटन केले तेव्हा माझ्यावर लांगूलचालनाचा आरोप का करण्यात आला नाही ? केवळ ईदच्या नमाजामध्ये सहभागी झाल्यावर असा आरोप कसा काय केला जातो ?’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *