सांगवडे (मावळ, जिल्हा पुणे) येथील धर्मशिक्षणवर्गात येणार्या बजरंग दलाच्या धर्माभिमान्यांची अभिनंदनीय कृती !
पुणे : मावळ भागातील सांगवडे येथे बजरंग दलाचे धर्माभिमानी युवक महाबळेश्वर येथील एका मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर त्यांना तेथे तोकड्या कपड्यांतील स्त्री-पुरुष देवळात दर्शनासाठी येत असल्याचे आढळून आले. ते पाहून धर्माभिमानी युवकांनी लगेचच मंदिर व्यवस्थापनाला निवेदन देऊन तोकड्या कपड्यांतील स्त्री-पुरुषांना मंदिरात येण्यास बंदी करावी, अशी मागणी केली. मंदिराच्या आवारात असा वेश परिधान केलेले कुणी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. हिंदु संस्कृतीसाठी असा प्रकार लांच्छनास्पद आहे. त्यावर पर्यायी व्यवस्था म्हणून योग्य ती रक्कम आकारून मंदिरात भगव्या वस्त्राची सोय उपलब्ध करून द्यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले होते. हे सर्व युवक येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्या धर्मशिक्षणवर्गात येतात. सर्वश्री करण भुजबळ, महेश राक्षे, रमेश हेगोंडे, दीपक तरस, अक्षय राक्षे, रवींद्र सावळे, गणेश जाधव, शुभम् आमले यांनी निवेदन दिले.
सर्व धर्माभिमानी धर्मरक्षणाच्या कार्यात सक्रीय सहभागी असून गणेशोत्सवाच्या कालावधीतही त्यांनी धर्मशास्त्रानुसार गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करावेे, म्हणून मोहीम राबवली होती. या युवकांपैकी अनेक जण समितीच्या धर्मशिक्षण वर्गाला नियमित येतात आणि त्यातून प्रेरणा घेऊन गावात हिंदूंचे सण-उत्सव यांविषयी प्रबोधनात्मक पत्रके वाटणे, गावातील मंदिरांची सामूहिक स्वच्छता करणे हे उपक्रम नियमितपणे करतात. १५ ऑगस्ट आणि गणेशोत्सवनिमित्त त्यांनी पुढाकार घेऊन सांगवडे आणि जवळील २ गावांमध्ये प्रबोधन मोहीमही राबवली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात