Menu Close

अतीक अहमद या माजी नगरसेवकाच्या कथित हत्येवरून शेकडो समर्थकांनी केली तोडफोड !

मध्यप्रदेशातील रीवा शहराला आले बंगालच्या मालदासारखे स्वरूप !

माजी मुसलमान नगरसेवकाच्या समर्थकांच्या असहिष्णुतेवर आता कोणीही बोलत नाही !

fanaticsरीवा (मध्यप्रदेश) : १३ फेब्रुवारीच्या रात्री येथील माजी नगरसेवक अतीक अहमद उपाख्य रॉकीचा मृत्यू झाला. त्यामुळे क्रोधित झालेल्या अहमदच्या ३०० समर्थकांनी अनेक वाहनांची तोडफोड केली. पोलिसांनी अहमद यांना कारागृहात डांबून त्यांना बेदम मारल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप समर्थकांनी लावला.

१. मिळालेल्या माहितीनुसार अहमद त्यांच्या सहकार्‍यांसह एक घर बळजोरीने रिकामे करत होते. त्यामुळे घटनास्थळी येऊन पोलिसांनी त्यांना अटक केली आणि कारागृहात डांबले.

२. कारागृहात घायाळ झालेल्या अहमद यांना स्थानिक चिकित्सालयात भरती करण्यात आले होते, जेव्हा त्याचा मृत्यू झाला.

३. त्यामुळे त्यांचे नातेवाईक आणि समर्थक यांनी चिकित्सालयात तसेच पोलीस आणि चिकित्सालयाच्या वाहनांची तोडफोड केली.

४. कोतवाली पोलीस ठाण्यावर दगडफेक करण्यात आली.

५. एका ठिकाणी जमलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली.

६. पोलीस ठाण्यातच असलेल्या उपनिरीक्षकाच्या गाडीला आग लावण्यात आली. (जर हिंसा करणारे कोण्या हिंदु संघटनेचे कार्यकर्ते असते, तर एव्हाना संपूर्ण देशात असहिष्णुता वाढल्याची आरोळी ठोकण्यात आली असती, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

७. शहरात तणावाचे वातावरण असून पोलीस अधिकार्‍यांनी १४४ कलम लागू केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *