- नैतिक अधःपतन झालेले हिंदू ! धार्मिक सणांच्या काळात साधना करण्याऐवजी वासना शमवण्याचा प्रयत्न करणार्या हिंदूंवर कधीतरी दुर्गादेवीची कृपा होऊ शकेल का ?
- स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला साधना आणि नीतीमत्ता न शिकवल्याचेच हे दुष्परिणाम आहेत ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक
कर्णावती : नवरात्रीच्या काळात निरोध आणि गर्भनिरोधक औषधे यांची विक्री वाढते. यावर्षीसुद्धा विक्री ३५ टक्क्यांनी वाढली आहे. यावर्षी नवरात्रीचा उत्सव चालू होण्याआधीच निरोध आणि गर्भनिरोधक औषधे यांची अधिक विक्री झाली, असे गुजरात स्टेट फेडरेशन केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जसवंत पटेल यांनी सांगितले.
गुजरातमध्ये निरोध आणि गर्भनिरोधक औषधे यांची महिन्याची उलाढाल २ कोटी रुपयांची आहे. नवरात्रीच्या दिवसांमध्ये हा व्यवसाय ३० ते ३५ टक्क्यांनी वाढतो. त्याचा निरोध उत्पादकांना थेट लाभ होतो.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात