- माकप केरळमधील मशीद किंवा चर्च यांवर त्याचा झेंडा लावण्याचे धाडस कधी करू शकतो का ?
- हिंदूंच्या मंदिरावर पक्षाचा झेंडा लावून हिंदूंंच्या धार्मिक भावना दुखावणार्या साम्यवादी युवा संघटनेवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे; मात्र केरळ सरकार तसे करणार नाही; म्हणून केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करायला हवा !
- ही निवळ गुंडगिरी आहे. झेंडा फडकवणे म्हणजे त्या ठिकाणी स्वत:ची मालकी सांगणे. मंदिरावर नास्तिकांची म्हणजे देवाला न मानणार्या साम्यवाद्यांची मालकी कशी असू शकते ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
चेन्गान्नुर (केरळ) : केरळच्या अल्लापुझा जिल्ह्यात पुलीयुर गावातील महाविष्णु मंदिरावर डी.वाय्.एस्.एफ्. या सत्तारूढ साम्यवादी पक्षाच्या युवा संघटनेने तिचा झेंडा फडकवल्याने वाद निर्माण झाला आहे. या मंदिरात १२ सप्टेंबर या दिवशी श्रीकृष्ण जयंती साजरी करण्यात आली. त्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ध्वज फडकवण्यात आला होता. त्यामुळे त्याला प्रत्युत्तर म्हणून असे केल्याचे डी.वाय्.एस्.एफ्.कडून सांगण्यात आले. ही घटना घडल्यावर मंदिराच्या व्यवस्थापनाने हा झेंडा काढून टाकला. या आधीही संघाने या मंदिरावर ध्वज लावले होते. त्यावर साम्यवादी शासनाने वाद निर्माण केला होता. त्यावर संघाने श्रीकृष्ण जयंतीच्या प्रसंगी लावलेले ध्वज काढून टाकण्यास अतिवृष्टीमुळे विलंब झाल्याचे कारण दिले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात