अकोला : येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांना नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवावे याविषयीचे निवेदन देण्यात आले. या अपप्रकारांमुळे समाज, राष्ट्र आणि धर्म यांची अपरिमित हानी होत आहे. तसेच देशाला सतत असलेला आतंकवादी कारवाया आणि धर्मांधांकडून होणार्या दंगली यांचा धोकाही आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क रहाणे आवश्यक आहे, असेही निवेदनातून सांगण्यात आले. या वेळी त्यांनी ‘मंडळासमवेत होणार्या पोलिसांच्या बैठकीला समितीला बोलावू. तुम्ही मंडळांना सर्व विषय सांगा’, असे म्हटले. या वेळी समितीचे सर्वश्री अजय खोत, प्रशांत पाटील, अविनाश मोरे, रणरागिणी शाखेच्या सौ. माधुरी मोरे, कु. निधी बैस उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात