-
सामाजिक कार्यकर्त्यांकडून पोलीस ठाण्यात तक्रार
-
तक्रारीनंतर खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून सर्व श्री गणेशमूर्ती खाणीत विसर्जन
हिंदूंनी केवळ तक्रार करून न थांबता संबंधितांवर कारवाई होण्यासाठी पाठपुरावा करणे अपेक्षित आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे : श्री गणेशमूर्ती विसर्जनास १० दिवस उलटून गेले, तरी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील कृत्रिम हौदांतील गणेशमूर्ती तशाच होत्या. धार्मिक भावना दुखावल्याने सामाजिक कार्यकर्ते मदन गाडे आणि गोपाळ नेटके यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार केली. गणेशमूर्तीच्या संबंधीचा पुढील विधी योग्य प्रकारे न केल्याने खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. तक्रारीनंतर मूर्ती वाघोली येथील खाणीत विसर्जित करण्यात आल्या. (तक्रार केल्यानंतर जागे होणारे श्री गणेशमूर्तींचे शास्त्राप्रमाणे विसर्जन होऊ देत नाहीत. यातून पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवण्याचा हेतू स्पष्ट होतो ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. अनंत चतुर्दशीला महादेववाडी येथे मुळा नदीपात्रातील घाटावर श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. तेथे कृत्रिम हौदही होते. विसर्जनानंतर हौदात अमोनियम बायकार्बोनेट घातले होते.
२. अनंत चतुर्दशीच्या १० दिवसांनंतर कृत्रिम हौदांतील मूर्ती तशाच होत्या. हौदांत रासायनिक पावडर घातली होती; मात्र श्री गणेशमूर्ती न विरघळल्याने पुढील प्रक्रिया करण्यात अडचण आली, असे अधिकार्यांनी सांगितले. (अघोरी पद्धतीने विसर्जन करू पहाणारे मूर्तींची विटंबना करत नाहीत का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात