सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने उज्जैन (मध्यप्रदेश) येथे कार्तिक मेळ्यात राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांविषयी प्रदर्शन
उज्जैन : वर्ष २०१६ मध्ये येथे चालू होणार्या सिंहस्थकुंभपर्वाचे मुख्य अधिकारी श्री. दिवाकर नातू, तसेच आज तक आणि दूरददर्शन या वाहिन्यांचे उज्जैन येथील प्रतिनिधी अन् दस्तक या ऑनलाईन वाहिनीचे मालक श्री. संदीप कुलश्रेष्ठ यांनी १७ डिसेंबर या दिवशी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कार्तिक मेळ्यात लावण्यात आलेल्या राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांविषयीच्या प्रदर्शनाला सदिच्छा भेट दिली.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश व्हनमारे यांनी श्री. दिवाकर नातू आणि श्री. संदीप कुलश्रेष्ठ यांना प्रदर्शनाची माहिती दिली. हे प्रदर्शन पाहून श्री. कुलश्रेष्ठ म्हणाले, समाजाला आवश्यक अशी दिशा या प्रदर्शनाच्या माध्यमातून दिली जात आहे. हिंदु समाजाला आवश्यक धर्मशिक्षण तुम्ही उपलब्ध करुन देत आहात हे कौतुकास्पद आहे. विश्वात हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे हे सत्यच तुम्ही मांडत आहात. माझे या कार्याला सहकार्य आहे. ग्रंथप्रदर्शनावरील सनातनचे ग्रंथ पाहून श्री. कुलश्रेष्ठ यांनी ग्रंथांच्या पूर्ण संचाची मागणी केली. हे ग्रंथ हिंदु संस्कृतीचा वारसा आहेत, असे त्यांनी सांगितले.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नाशिक येथे झालेल्या सिंहस्थ पर्वातही राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांविषयीचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला श्री. दिवाकर नातू यांनी सदिच्छा भेट दिली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात