Menu Close

हिंदूंवरील धर्मांधांच्या वाढत्या आक्रमणांच्या अन्वेषणासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात यावी ! – हिंदुत्वनिष्ठ

वाराणसी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

वाराणसी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ

वाराणसी : उत्तरप्रदेशमध्ये मागील काही दिवसांमध्ये धर्मांधांकडून मंदिरांमध्ये घुसून मूर्तींची विटंबना करणे, तोडफोड करणे, हिंदूंच्या घरांवर आक्रमण करणे, हिंदूंच्या मिरवणुकांवर दगडफेक करणे इत्यादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा प्रकरणांचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात यावी, मंदिरांना कडक सुरक्षा पुरवण्यात यावी, या मागण्यासाठी येथील शास्त्री घाट येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये हिंदु युवा वाहिनीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. मनीष पांडेय, विश्‍व हिंदू महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. अविनाश यादव, हिंदु सेनेचे शिवपूर विधानसभा क्षेत्राचे उपाध्यक्ष श्री. हेमंत मिश्र, हिंदु जागरण मंचाचे श्री. रवि श्रीवास्तव तथा श्री. शुभम मिश्रा, अधिवक्ता अवनीश राय, अधिवक्ता अनुप कुमार, अधिवक्ता विनोद कुमार पटेल यांच्यासह हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

इतर मागण्या

१. बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारकडून मोहरमच्या दिवशी नवरात्रोत्सवाच्या विसर्जनावर बंदी घातली आहे. केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करून ही बंदी हटवावी.

२.लव्ह जिहाद’च्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावर पोलिसांचे विशेष पथक स्थापन करण्यात यावे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

लव्ह जिहादच्या भीषणतेची लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी हिंदु जनजागृती समितीने ‘लव्ह जिहाद’ हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. हा ग्रंथ तुम्ही स्वत: वाचा तसेच इतरांनाही या ग्रंथाबद्दल सांगा !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *