Menu Close

सांप्रदायिक तणाव पसरवण्यासाठी पाककडून रोहिंग्या मुसलमानांचा वापर ! – तौफिक इमाम

मुसलमानबहुल बांगलादेशमधूनही रोहिंग्यांचा आणि त्यांचा तणावासाठी वापर करणार्‍या पाकचा विरोध केला जात आहे; मात्र भारतातील धर्मांध हे रोहिंग्यांची बाजू घेऊन देशद्रोह करत आहेत. अशांना सरकारने कारागृहात डांबण्याचे धाडस दाखवले पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

तौफिक इमाम, बांगलादेशचे राजकीय सल्लागार

कोलकाता : बांगलादेशातील गुप्तचर संघटनांनी दिलेल्या अहवालानुसार पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएस्आय ही रोहिंग्या मुसलमानांच्या सूत्राचा वापर म्यानमारजवळील सीमेवर सांप्रदायिक तणाव पसरवण्यासाठी करत आहे, असे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांचे राजकीय सल्लागार तौफिक इमाम यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की,

१. आयएस्आय वर्ष १९६९ पासूनच रोहिंग्या फुटीरतावाद्यांचे समर्थन करत आहे.  आयएस्आय पुन्हा एकदा रोहिंग्यांना पाठिंबा देऊन दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियात जिहाद पसरवण्याची सिद्धता करत आहे.

२. लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेचे समर्थन करणार्‍या ‘आराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मी’ सारख्या जिहादी संघटना भारत, म्यानमार आणि बांगलादेश यांच्यासाठी धोकादायक आणि शत्रू आहेत.

३. बांगलादेशातील सक्रीय आतंकवादी संघटना जमात-उल-मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तोयबा यांच्याशी ‘आराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मी’ चे संबंध आहेत. बांगलादेशाने आतापर्यंत कधीच आतंकवाद सहन केला नसून बांगलादेशातून निर्माण झालेल्या भारताच्या उत्तर-पूर्व भागातील सर्व आतंकवादी संघटनांना नष्ट केले होते. आताही ‘आराकान रोहिंग्या सॅल्वेशन आर्मी’ (एआर्एस्ए) आणि अन्य आतंकवादी संघटनांना नष्ट करण्यात येईल.

४. रोहिंग्यांच्या सूत्रावरून शेख हसीना यांच्या शासनाला अस्थिर करण्याचे षड्यंत्र रचले जात असून गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्गापूजेच्या वेळी सांप्रदायिक तणाव पसरवण्यासाठी रोहिंग्यांचा वापर केला जाऊ शकतो.

५. रोहिंग्या शरणार्थींची समस्या मानवतेशी निगडित असल्यामुळे बांगलादेशने त्यांना आश्रय दिला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *