Menu Close

‘डीएव्ही शाळांमधून करण्यात येणारे मंत्रपठण बंद करा !’ – हाजी मिर्झा

कर्णावती येथील नगरसेवक हाजी असरार बेग मिर्झा यांची सीबीएस्ईकडे मागणी

  • हिंदूंना आवश्यकता नसतांना दिवसांतून ५ वेळा मशिदींवरील भोंग्यांवरून अजान ऐकवली जाते, ती प्रथम हाजी मिर्झा यांनी बंद करून दाखवली पाहिजे !
  • मुसलमान नगरसेवक त्यांच्या धर्माच्या प्रती जागृत असतांना हिंदु लोकप्रतिनिधी कधी अशी जागृती दाखवतांना दिसत नाहीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

कर्णावती : येथील मकतमपुरामधील नगरसेवक हाजी असरार बेग मिर्झा यांनी सीबीएस्ई (मध्यवर्ती माध्यमिक शिक्षण मंडळ)ला पत्र लिहून ‘येथील डीएव्ही इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून करवून घेण्यात येणारे गायत्रीमंत्राचे पठण बंद करण्यात यावे’, अशी मागणी केली आहे. अशा प्रकारे मंत्रपठण करणे अन्य धर्मियांवर बळजोरीने थोपण्यासारखे आहे, असे त्यांनी यात म्हटले आहे. मिर्झा यांनी ‘संपूर्ण देशातील डीएव्हीच्या शाळांना अशा प्रकारची बंदी घालावी’, अशीही मागणी केली आहे.

मिर्झा यांनी म्हटले की, शाळांमध्ये रमझान ईद आणि ईद-ए-मिलाद हे सणही साजरे केले पाहिजेत. मुसलमान मुलांना योग करणे आणि भोंग्यांवरून गायत्री मंत्र ऐकवणे बंधनकारक करायला नको. शाळेत प्रवेश घेतांना शाळेने सांगितले होते की, वर्षातून एकदा किंवा दोनदा हवन केले जाते; मात्र येथे प्रतिदिन गायत्री मंत्रपठण करण्यास सांगितले जाते. शाळेत वेदही शिकवले जातात आणि परीक्षाही घेतली जाते. तसेच येथील मैदानात मंदिरही आहे. हा आमच्याशी केलेला धोका आहे.

डीएव्ही इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका निवेदिता गांगुली यांनी सांगितले की, आमची शाळा कोणताही भेदभाव करत नाही. येथे जात आणि धर्म यांच्या आधारे भेदभाव केला जात नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *